“मी आमच्या लोकांना…”, राज ठाकरेंचं मांसविक्री बंदीबाबत मोठं विधान
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी मटण-मांस विक्रीवर बंदी घातली आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोकांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे. महानगरपालिकेला हे अधिकार नाहीत. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे महत्त्वाचे दिवस असून, या दिवशी बंदी घालणे विरोधाभासी आहे.