“बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस…”, रामदास कदमांचा सवाल; म्हणाले, “हातांचे ठसे…”
दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा आणि नेस्को सेंटरला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा झाला. रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावरून टीका केली आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना संपवल्याचा आरोप केला.