मारहाण संजय गायकवाडांनी केली, परवाना कॅन्टिनवाल्याचा रद्द झाला; आमदार निवसातील घटनेचे…
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाच्या कँटिनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. गायकवाड यांनी जेवणाच्या दर्जावर तक्रार केली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कँटिनचालकाचा परवाना रद्द केला आहे.