शरद पवार, अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात साखर संकुल येथे भेट झाली. या भेटीत त्यांनी काय चर्चा केली याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेवर निर्णय शरद पवार आणि अजित पवारच घेऊ शकतात असे म्हटले. सुप्रिया सुळे यांनीही एकत्र येण्याच्या चर्चांना नकार दिला. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.