Video: “राज्य सरकारचा महत्त्वाचा, तरीही हास्यास्पद निर्णय”, गिरीश कुबेर यांचं विश्लेषण…
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने चर्चा होत आहे. विरोधकांनी राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याची टीका केली आहे, तर सरकारने सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. गिरीश कुबेर यांनी सोलापूर व चिपी विमानतळांसाठी अनुदान देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी एसटी बसेसना अनुदान देण्याची मागणी केली आहे. भजनी मंडळांसाठी २५ हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णयही त्यांनी विनोदी म्हटला आहे.