उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “कुठलीही समिती नेमा, महाराष्ट्रात आता हिंदी….”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाल्याचे सांगितले. त्यांनी भाजपावर टीका केली आणि मराठी भाषिकांचे आभार मानले. ठाकरे म्हणाले की, हिंदी सक्तीचा विषय संपला असून, ५ जुलैला विजयी मेळावा किंवा मोर्चा काढण्याचा निर्णय दोन दिवसांत घेणार आहेत. मराठी आणि अमराठी वाद सरकारला घडवायचा होता, पण त्यात ते अपयशी ठरले.