“महाराष्ट्रात १५-२० वर्षे राहूनही मराठी येत नसेल; तर लाज…”, अभिनेत्रीचं स्पष्ट मत
काही दिवसांपूर्वी राज्यात मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आला होता. राज्य सरकारने शाळांमध्ये हिंदी अनिवार्य केल्याने विरोध झाला आणि जीआर रद्द करण्यात आला. अभिनेत्री श्रुती मराठेने यावर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, महाराष्ट्रात २०-२५ वर्षे राहूनही मराठी न शिकणे लाजिरवाणे आहे. तिने तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीतील अनुभव सांगत, भाषिक समन्वयाची गरज व्यक्त केली.