IPS अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवार वादावर छोटा पुढारीची प्रतिक्रिया; म्हणाला…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर 'बिग बॉस मराठी ५'मधील स्पर्धक घन:श्याम दरवडेने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अंजना कृष्णा यांच्या धाडसाचे कौतुक केले आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हटले. अजित पवारांच्या भाषेची टीका करत, अंजना कृष्णा यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.