कैदी क्रमांक ७६९७, फरशीवर झोपला अन्…; अल्लू अर्जुनने तुरुंगात ‘अशी’ घालवली रात्र
अल्लू अर्जुन: ४ डिसेंबरला हैदराबादमधील 'पुष्पा 2'च्या प्रिमियर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तेलंगणा हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तुरुंग प्रशासनाने जामिनाची प्रत उशिरा मिळाल्याने शनिवारी सकाळी त्याची सुटका झाली.