“इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम आहे…”; भार्गवी चिरमुलेचं वक्तव्य, म्हणाली, “दुर्दैवं…”
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल तिचं मत मांडलं आहे. ती म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम शंभर टक्के आहे आणि त्या ग्रुपमध्ये प्रवेश करणं खूप कठीण आहे. त्यामुळे आमच्या सारख्या कलाकारांना संधी मिळत नाही. भार्गवी सध्या 'मर्डरवाले कुलकर्णी' नाटकात काम करत आहे आणि तिने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.