तब्बल २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया याने मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली. 'प्यार में कभी कभी' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर 'राज' चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र, त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आणि त्याने बॉलीवूड सोडले. डिनोने 'कूल मॉल' आणि 'क्लॉकवाइज फिल्म्स' प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. त्याने 'द फ्रेश प्रेस' ज्यूस कंपनीची स्थापना केली असून त्याची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये आहे.