शिल्पा शेट्टी-राज कुंद्रांच्या अडचणींत वाढ, ६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात मुंबईतील व्यावसायिक दीपक कोठारी यांनी ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्ज व्यवहारात फसवणूक झाल्याचा दावा कोठारी यांनी केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिल्पा शेट्टीने २०१६ मध्ये संचालक पद सोडले होते.