‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात का सापडला आहे? नेमकं हे प्रकरण काय?
'द बंगाल फाईल्स' हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट येत्या ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. फाळणीनंतर बंगालमध्ये काय घडलं? यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी आधी दिग्दर्शित केलेल्या द कश्मीर फाईल्स आणि द ताश्कंत फाईल्स या चित्रपटांवरुन जसा वाद निर्माण झाला होता असाच एक वाद या चित्रपटावरुनही निर्माण झाला आहे.