दिल्लीमधील स्फोटप्रकरणी मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया; पोस्ट शेअर करीत म्हणाले…
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २२ हून अधिक लोक जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मराठी कलाकार केतकी माटेगांवकर, सलील कुलकर्णी, पुष्कर जोग आणि बॉलीवूड कलाकार सोनू सूद, रवीना टंडन, रिद्धिमा कपूर यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.