अहमदाबाद विमान अपघातात कंपनीची चूक होती का? माजी वैमानिक गौरव तनेजाने व्यक्त केलं मत
गौरव तनेजा अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल रोज अपडेट्स देत आहे. त्याने अपघाताचे कारण इंजिनातील बिघाड आणि ओव्हरलोडिंग असल्याचे सांगितले होते. नवीन व्हिडीओमध्ये त्याने खराब हवामानात उड्डाण उशिरा करण्याचा इशारा मिळतो असे सांगितले. फ्लाइट एआय-१७१ मध्ये एक इंजिन टेकऑफनंतर निकामी झाले. गौरवने विमानाच्या अडचणींवर चर्चा केली आणि कंपनी पायलटवर जबाबदारी टाकते असे म्हटले.