“अजूनही विश्वास बसत नाहीय…”, असरानींच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूड आणि मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. असरानी यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.