“गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका..”, कॉमेडियन मंदार भिडे का संतापला?
२७ ऑगस्टला गणरायाचं आगमन झालं आणि दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. विलेपार्ल्यात विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना दंड भरावा लागला. यावर स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडेने व्हिडीओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. गणपतीच्या दिवशी मराठी लोकांच्या भावनेशी खेळू नका, असं त्याने म्हटलं. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.