“आपण कुणाचे तरी भक्त झालो आहोत”, मराठी गायकाचं मत; भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल म्हणाला…
आशिया कपच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर मराठी गायक मंगेश बोरगांवकरने एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने भारत-पाकिस्तान मॅचवरून समाजात निर्माण झालेल्या मतभेदांवर भाष्य केले. मॅच होण्याने किंवा न होण्याने काही फरक पडत नाही, असे सांगून त्याने नागरिकांनी त्यांच्या मूलभूत गरजांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. राजकारण्यांचे भक्त न होता, आपले हक्क आणि गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.