कपिल शर्माचा कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’ पुन्हा सुरू, दहा दिवसांपुर्वी झालेला गोळीबार
कॉमेडियन कपिल शर्मा, जो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे प्रसिद्ध आहे, त्याने कॅनडामधील सरे येथे 'कॅप्स कॅफे' नावाचे कॅफे सुरू केले होते. मात्र, कॅफे सुरू झाल्यानंतर तीन दिवसांतच त्यावर हल्ला झाला. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दहा दिवसांनंतर कॅफे पुन्हा सुरू करण्यात आले आहे.