अमिताभ बच्चन यांच्याशी कथित उद्धट वागणारा KBC बॉय इशित भट्ट आता पुन्हा चर्चेत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन २५ वर्षांपासून कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. केबीसीच्या १७व्या हंगामात १० वर्षांचा इशित भट्ट चर्चेत आला. अमिताभ बच्चन यांच्यासमोर उद्धटपणा केल्यामुळे इशितला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इशितच्या नावाने इन्स्टाग्रामवर माफी मागण्यात आली आहे. या पोस्टमध्ये इशितने आपल्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला आणि भविष्यात अधिक नम्र राहण्याचे वचन दिले.