Mahavatar Narsimha ने गाठला कमाईचा नवा विक्रम; आतापर्यंतची कमाई तब्बल…
अॅनिमेटेड चित्रपट 'महावतार नरसिम्हा'ने प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. अवघ्या २० दिवसांत या चित्रपटाने भारतात ₹१३८.७५ कोटींची कमाई केली आहे आणि टॉप ८० हिंदी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. भारतीय अॅनिमेशनला नव्या उंचीवर नेणाऱ्या या चित्रपटाने 'जुड़वा २', 'बधाई हो' आणि 'टॉयलेट: एक प्रेम कथा' यांना मागे टाकले आहे. 'वॉर २'ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे 'महावतार नरसिम्हा'ला अधिक प्रेक्षक पसंती मिळाली आहे.