भरत जाधव आणि महेश मांजरेकरांच्या नवीन नाटकाची घोषणा; लोकप्रिय अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत
भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या नवीन नाटकाची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे. 'शंकर जयकिशन' या नाटकात भरत जाधव, महेश मांजरेकर आणि शिवानी रांगोळे प्रमुख भूमिकेत आहेत. विराजस कुलकर्णी यांनी लेखन केलेले आणि सुरज पारसनीस यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर या नाटकाच्या घोषणेला प्रेक्षक आणि कलाकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.