सई ताम्हणकरबरोबरचं गाणं पाहून समीर चौघुलेंच्या वडिलांची होती ‘ही’ भन्नाट प्रतिक्रिया
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदवीरांना नवीन ओळख मिळाली आणि ते अधिक प्रसिद्धीच्या झोतात आले. याच कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले समीर चौघुलेंनी आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. लवकरच समीर यांचा ‘गुलकंद’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ते सई ताम्हणकरबरोबर पाहायला मिळणार आहेत. याच चित्रपटात सईबरोबरचं गाणं पाहून समीर चौघुलेंच्या वडिलांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली.