“हा सिनेमा हिंदू-मुस्लिमांबद्दल नाही”, ‘हरी हर वीर मल्लू’वर पवन कल्याण यांची प्रतिक्रिया
गेल्या काही वर्षांत भारतीय सिनेमांमध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट आले आहेत. 'हरी हर वीर मल्लू' हा पवन कल्याण यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटावर धार्मिक संघर्ष दाखवला गेल्याची टीका होत आहे. पवन कल्याण यांनी स्पष्ट केलं की, हा चित्रपट हिंदू-मुस्लिम संघर्षावर आधारित नसून चांगल्या आणि वाईटमधील संघर्षाचा प्रवास आहे. इतिहासातील सत्य सांगायला आपण घाबरू नये, असंही त्यांनी म्हटलं.