प्रशांत दामलेंनी संकर्षण कऱ्हाडेचं केलं भरभरून कौतुक, दिलं ‘हे’ खास सरप्राइज; म्हणाले…
चतुरस्त्र कलाकार संकर्षण कऱ्हाडे याच्या वाढदिवसानिमित्त, प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामलेंनी त्याला खास सरप्राइज दिलं. १०४ प्रयोगांनंतर पहिल्यांदाच 'कुटुंब किर्रतन' नाटक पाहून प्रशांत दामलेंनी संकर्षणचं कौतुक केलं. या नाटकात वंदना गुप्ते आणि तन्वी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांनी संकर्षणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.