परभणीतील नाट्यगृहांची दूरवस्था पाहून संकर्षणने व्यक्त केली नाराजी, म्हणाला; “वाईट वाटलं…”
नाट्यगृहांच्या दूरवस्थेबद्दल आजवर अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सध्या 'कुटुंब किर्रतन' नाटकाच्या मराठवाडा दौराय सुरू आहे आणि यात त्याचं गाव परभणी नाही. परभणीतील रंगमंदिराची दुरावस्था असल्याने तिथे नाटक सादर करता येत नाही, याबद्दल त्याने खेद व्यक्त केला. पुढे त्याने कधीतरी इथेही प्रयोग होईल अशी आशा आहे असं म्हणत चाहत्यांना नाटकाला येण्याचे आवाहन केले आहे.