सारंग साठ्ये व पॉला अडकले लग्नबंधनात! पोस्ट शेअर करीत दिली गुड न्यूज, म्हणाला…
लोकप्रिय स्टॅंडअप कॉमेडियन, दिग्दर्शक व अभिनेता सारंग साठ्येने त्याची गर्लफ्रेंड पॉला हिच्याशी २८ सप्टेंबर रोजी लग्न केले. सारंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. दोघे १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सारंग व पॉला 'भाडिपा' यूट्यूब चॅनेलचे सह-संस्थापक आहेत आणि विविध विषयांवर आधारित कंटेंट बनवतात.