“आम्हाला हे सगळं पाहून फारच वाईट वाटलं”, समय रैनाला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं!
स्टँडअप कॉमेडियन रणवीर अलाहबादिया व समय रैना यांना 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधील अश्लाघ्य टिप्पणीबद्दल न्यायालयीन कारवाईचा सामना करावा लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला आणखी एका टिप्पणीवरून फटकारलं आहे. रैनाने दिव्यांग व्यक्तींबाबत हेटाळणीखोर विधानं केल्याची तक्रार 'क्युअर एसएएम फाऊंडेशन'ने केली होती. न्यायालयाने या प्रकरणात सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.