ऋता अन् ललितच्या ‘आरपार’चा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ खास दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि हँडसम अभिनेता ललित प्रभाकर लवकरच 'आरपार' या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात दोघांचा रोमँटिक अंदाज आणि नात्यातील विविध कंगोरे दाखवले आहेत. 'आरपार' १२ सप्टेंबर रोजी, ऋता आणि ललितच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. गौरव पत्की यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.