‘दशावतार’चा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खास ‘शो’; कलाकारांचा सन्मान करत म्हणाले…
'दशावतार' या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे गोव्यात विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी चित्रपटाच्या टीमचा सन्मान केला आणि शुभेच्छा दिल्या. 'दशावतार'ने आतापर्यंत सात कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर यांसारखे कलाकार आहेत.