सस्पेन्स, ड्रामा आणि बरंच काही…; दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’चा ट्रेलर प्रदर्शित
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या आगामी 'दशावतार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांसारखे अनेक दर्जेदार कलाकार आहेत. ट्रेलरमध्ये सस्पेन्स, थ्रिल, भावनांचा खेळ, रूढी परंपरा आणि आधुनिक आव्हाने दिसतात. सुबोध खानोलकर यांनी कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 'दशावतार' १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.