“‘दशावतार’ पाहण्यासाठी व्हीलचेअरवर…”, प्रेक्षकांचं प्रेम पाहून गहिवरले दिलीप प्रभावळकर
१२ सप्टेंबर रोजी आलेल्या 'दशावतार' सिनेमाने चौथ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल दिलीप प्रभावळकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक प्रेक्षकांनी आजारी नातेवाईकांना व्हीलचेअरवर घेऊन सिनेमा पाहिला. प्रभावळकरांनी सांगितले की, सिनेमाला मिळालेला प्रतिसाद त्यांच्या आणि संपूर्ण टीमसाठी आनंददायी आहे. 'दशावतार'मध्ये दिलीप प्रभावळकरांसह महेश मांजरेकर, भरत जाधव यांसारखे कलाकार आहेत.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 