‘जत्रा’वेळी क्रांती रेडकरचा झाला असता मोठा अपघात पण…; केदार शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
केदार शिंदे यांनी 'जत्रा' चित्रपटाच्या सेटवरील एक घटना सांगितली. पावसामुळे शूटिंग थांबवून काही जण पाचगणीला जात होते, ज्यात क्रांती रेडकर होती. केदार यांनी तिला थांबवलं आणि ती गाडी बदलली. पुढे ती गाडी अपघातग्रस्त झाली. क्रांतीने सांगितलं की, तिच्या जागी बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. 'जत्रा' चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला आणि आजही लोकप्रिय आहे.