महेश मांजरेकरांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लांबणीवर, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' नंतर 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट दिवाळी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता तो १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, सयाजी शिंदे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले असून, निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली आहे.