“ते मुख्यमंत्री होते तेव्हा…”, महेश मांजरेकरांनी सांगितला उद्धव ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबरचा एक किस्सा शेअर केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महेश मांजरेकरांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. मुलीच्या सिनेमाच्या निमित्ताने तेलुगू नायकाला उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं. भेट १५ मिनिटांची ठरली होती, पण ती २ तास चालली. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि आदित्य यांनी त्यांचे आदरातिथ्य केले.