गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला…
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आपल्या विनोदी शैलीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या एनर्जीचं नेहमी कौतुक केलं जातं. सध्या सिद्धार्थ ‘स्टार प्रवाह’च्या ‘आता होऊ दे धिंगाणा ३’मध्ये पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या सलग तिसऱ्या पर्वाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सिद्धार्थ जाधवकडे देण्यात आली आहे. अशातच सिद्धार्थने गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.