“प्रेक्षकांवर खापर फोडू नका, चूक स्वीकारा”, केदार शिंदेंबद्दल मराठी अभिनेत्याचं वक्तव्य
मराठी अभिनेता वरद चव्हाणने केदार शिंदे यांच्या 'झापुक झुपूक'च्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे. वरदने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत केदार शिंदेंच्या विचारांवर टीका केली. त्याने सांगितले की, प्रेक्षकांनी सूरज चव्हाणला हिरो म्हणून नाकारले होते. वरदने केदार शिंदेंच्या ट्रोलर्सबद्दलच्या प्रतिक्रियेवरही नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की, प्रेक्षकांना हवे तसे कंटेंट देणे गरजेचे आहे आणि अपयश स्वीकारणे महत्त्वाचे आहे.