“खूपच भयाण…”, छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवलेलं, त्याठिकाणी पोहोचली मराठी अभिनेत्री
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री अर्चना नेवरेकरने संगमेश्वर कसबा येथील महाराजांना कैद ठेवलेल्या वाड्याला भेट दिली. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या मुलाला इतिहास आणि संस्कृती समजवण्याचे महत्त्व सांगितले. तिच्या पोस्टमध्ये ती म्हणते, "प्रत्येक आई जिजाबाई होऊ शकत नाही, पण चांगला माणूस घडवण्यासाठी मनाची तयारी लागते."