“अपघातानंतर वर्षभर नवस फेडले”, निवेदिता सराफांनी सांगितली आठवण, चाहत्याचा किस्सा केला शेअर
नायक असो किंवा खलनायक... अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांना 'महाराष्ट्र भूषण' आणि 'पद्मश्री' पुरस्कार मिळाले आहेत. १९८७ साली त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता, ज्यातून ते चाहत्यांच्या प्रेमामुळे बचावले. याबद्दल पत्नी निवेदिता यांनी तेव्हा एक माणूस कोल्हापुरहून मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात चालत आला होता ही आठवण सांगितली आहे.