रीमा लागूंनी घरच्यांच्या नकळत दिलेले साडेतीन लाख रुपये, शरद पोंक्षेंनी सांगितली आठवण
बॉलीवूडमध्ये आईच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध रीमा लागू यांनी १८ मे २०१७ रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आदर्श आईची भूमिका साकारली. खऱ्या आयुष्यातही त्या मदतीला धावून येणाऱ्या होत्या. शरद पोंक्षेंना घर घेण्यासाठी २००० साली त्यांनी साडे तीन लाख रुपयांची मदत केली होती. स्वत: शरद पोंक्षेंनी त्यांच्या रीमा लागूंनी केलेल्या या मदतीबद्दल आणि त्यांच्या खास नात्याबद्दल सांगितलं आहे.