“वाईट वाटतं…”, ट्रोलिंगबद्दल संतोष जुवेकरने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “लोक निंदा…”
संतोष जुवेकर हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडेच 'छावा' चित्रपटामुळे चर्चेत आलेला संतोष ट्रोलिंगचा सामना करत होता. त्यानं विकी कौशलबरोबरचा एक किस्सा शेअर केल्यामुळेही ट्रोल झाला. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत संतोषनं ट्रोलिंगबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानं सांगितलं की, ट्रोलिंगमुळे वाईट वाटतं, पण आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.