अश्विनी भावेंनी केलेल्या आदरातिथ्याने भारावली सोनाली कुलकर्णी, पोस्टद्वारे सांगितला अनुभव
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशातील त्यांच्या घरी मराठी इंडस्ट्रीमधील अनेक तारेतारकांना आमंत्रित केले होते. त्यांनी सर्व पाहुण्यांचं प्रेमाने आदरातिथ्य केलं आणि स्वत:च्या शेतीची सफर घडवली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर अश्विनीच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. या पार्टीत डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी यांसारखे कलाकार उपस्थित होते.