“माझ्या वांगडा चल” म्हणतो, तर शाळेत…; हिंदी सक्तीबद्दल वैभव मांगलेंची पोस्ट, म्हणाले…
सध्या राज्यात हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून चर्चा सुरू आहे. मराठी कलाकारांनी यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते वैभव मांगले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मराठी भाषेची स्थिती चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी मराठी भाषेच्या अनादरावर नाराजी व्यक्त केली आणि मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्याची गरज अधोरेखित केली.