‘इतरांसह मलाही सुबुद्धी मिळो’, विसर्जन पार पडताना मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी येथे गणरायाला निरोप दिला. फडणवीस यांनी गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलीस आणि महानगरपालिकेच्या व्यवस्थेचे कौतुक केले. आगामी निवडणुकांबाबत विचारले असता, बाप्पाकडे फार काही मागायचे नसते, असे उत्तर त्यांनी दिले.