मुंबईच्या घाटकोपरमधील गोल्ड क्रेस्ट इमारतीला आग, अनेक जण अडकल्याची भीती
मुंबईतील घाटकोपर येथील गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क इमारतीला आग लागली आहे. मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. काही लोक इमारतीत अडकले असल्याने चिंता वाढली आहे. तळमजल्यावर लागलेली आगीच वरपर्यंत लोळ दिसत आहेत. फायर अलार्म वाजताच अनेकजण बाहेर पडले, तर काहींना अग्निशमन दलाने बाहेर काढले आहे.