४ हिरो अन् ४ एपिसोड, १०० कोटींचं बजेट असलेली नेटफ्लिक्सची ही सीरिज पाहिलीत का?
जर तुम्हाला ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज व शो पाहायला आवडत असेल तर 'द रेल्वे मॅन' ही सीरिज नक्की पाहा. चार एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स व वायआरएफ एंटरटेनमेंटने तयार केली आहे. आर माधवन, दिव्येंदु, केके मेनन आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित ही सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली असून IMDb वर ८.५ रेटिंग मिळाले आहे.