Bigg Boss OTT 3 फेम अभिनेत्याची फसवणूक, जवळच्या मित्राने लाखों रुपयांना गंडवलं
प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख याच्यासोबत आर्थिक फसवणुकीची घटना घडली आहे. त्याच्या जवळच्या मित्रानेच चार लाख रुपये आणि जिममधील महागडं उपकरण चोरलं आहे. अदनानने हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं की, त्याच्या मित्राने हृदयविकाराचा खोटा बहाणा करून पैसे चोरले. अदनान ‘बिग बॉस ओटीटी ३’ आणि ‘ऐस ऑफ स्पेस २’मध्ये दिसला होता. नुकताच तो बाबा झाला आहे.