‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दोन वर्षांनी दिली गुडन्यूज
संजय लीला भन्साली यांच्या 'हिरामंडी' सीरिजमधील अभिनेत्री शर्मीन सेगल नुकतीच आई झाली आहे. पत्रकार विक्की लालवाणी यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. शर्मीनने २८ मे रोजी मुलाला जन्म दिला. दरम्यान, अद्याप जोडप्याकडून याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण विक्की लालवाणींनी शेअर केलेल्या पोस्टमुळे शर्मीनचे अनेक चाहते तिच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव करत आहे. २०२३ मध्ये टोरेंट फार्मास्युटिकल्सचे कार्यकारी संचालक अमन मेहता यांच्याशी तिचे लग्न झाले होते.