‘या’ दिवशी येणार मनोज बाजपेयीची बहुचर्चित ‘द फॅमिली मॅन ३’; नव्या सीझनमध्ये काय आहे खास?
'द फॅमिली मॅन' ही मनोज बाजपेयीची लोकप्रिय वेबसीरिज आहे. दोन यशस्वी सीझन्सनंतर, तिसऱ्या सीझनची उत्सुकता अखेर संपली आहे. प्राईम व्हिडीओने तिसऱ्या सीझनचा टीझर व्हिडीओ शेअर केला असून, २१ नोव्हेंबरला हा सीझन प्रदर्शित होणार आहे. या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी देशाच्या सीमांपलीकडून येणाऱ्या धमक्या आणि अंतर्गत संकटांशी झुंज देताना दिसेल. प्रेक्षकांना मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावतच्या अभिनयाची प्रतीक्षा आहे.