वैष्णवी हगवणेच्या लग्नात रुखवतासाठी दीड लाखांचा खर्च? अंजली दमानियांच्या पोस्टने खळबळ
मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. तिच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च झाले होते आणि ५१ तोळे सोन्यासह रोख रक्कम हुंडा म्हणून देण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, लाखो रुपये वैष्णवीच्या नवऱ्याच्या मामीला देण्यात आले होते. त्यांनी बँक स्टेटमेंटसह पुरावे सादर केले आहेत.